MH13 News Network
सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 111 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज बुधवारी दि.17 मार्च रोजी ग्रामीण भागातील 111 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 74 पुरुष तर 37 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 67 आहे. यामध्ये पुरुष 43 तर 24 महिलांचा समावेश होतो .आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 2889 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2778 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 41 हजार 950 इतकी झाली आहे. यामध्ये 26,096 पुरुष तर 15,854 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
दोघांचा मृत्यू
बार्शी येथील कासारवाडी रोड येथील 65 वर्षाचे पुरुष, बार्शी मधील शिवाजीनगर भागातील 73 वर्षांचे पुरुष या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1203 जणांचा मृत्यू झाला आहे यात 865 पुरुष तर 338 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1005 आहे .यामध्ये 609 पुरुष तर 396 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 39 हजार 742 यामध्ये 24,622 पुरुष तर 15,120 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट -नागरी 4 तर ग्रामीण 1
बार्शी –नागरी 15 तर ग्रामीण 2
करमाळा –नागरी 9 ग्रामीण 8
माढा – नागरी 0 तर ग्रामीण 30
माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 20
मंगळवेढा – नागरी 3 ग्रामीण 2
मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 2
उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2
पंढरपूर – नागरी 3 ग्रामीण 8
सांगोला – नागरी 0 ग्रामीण 1
दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0
आजच्या नोंदी नुसार नागरी -35 तर ग्रामीण भागात 76 असे एकूण 111 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.
Leave a Reply