Big 9 News Network
भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन स्मृतिदिनानिमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर भाजपा कार्यालयात अभिवादन केले .
कौशल्य संघटन, प्रखर वक्तृत्वांच्या आणि संवेदनशील मनाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलणारे अष्टपैलू नेतृत्व, दिवंगत केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांचा आदर्श आणि विचार सर्वांनी जीवनात अंगीकारला पाहिजे असे विचार या निमित्ताने आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शहराध्यक्ष विक्रम देशमुख संघटन मंत्री रुद्रेश बोरामणी, माजी परिवहन सभापती जय साळुंके,चिटणीस नागेश सरगम, नगरसेवक डॉ किरण देशमुख, अमर पुदाले, नारायण बनसोडे, रवी कैय्यावाले, मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, अविनाश बेंजरपे,सचिन कुलकर्णी सोशल मीडिया संयोजक योगेश गिराम, कार्यालय मंत्री सुनील टोणपे आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply