सोलापुरात केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांचे स्वागत

BIG 9 NEWS NETWORK

केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांचे स्वागत माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन केले

सोलापूर – सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचे अनावरण शनिवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता नियोजन भवन सभागृह येथे केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते हा समारंभ होणार आहे. यासाठी आज १ ऑक्टोबर रोजी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांचे शासकीय विश्राम गृह येथे आगमन झल्यांनातर त्यांचे स्वागत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी सभागृहनेते शिवानंद पाटील, शहरअध्यक्ष विक्रम देशमुख, परिवहन सभापती जय साळुंखे यांनी देखील केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

यावेळी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख आदीजन उपस्थित होते.