BIG 9 NEWS NETWORK
कोविड लसीकरण आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सोलापूर– सोलापूर महानगरपालिका, इंडियन रेडक्रॉस सोसायटी,दमानी ब्लड बँक सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने लसीकरण आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका प्रांगणात आज महापौर सौ. श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते तर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला.शहरातील अंध-अपंग ,व्याधिग्रस्त लोकांसाठी ,ज्येष्ठ नागरिक यांचेसाठी ही लसीकरण मोहीम वरदान ठरणार आहे. लसीकरण आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जे लोक केंद्रावर येऊन लसीकरण घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. यावेळी उपआयुक्त धनराज पांडे,आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे,लसीकरण समन्वयक डॉ मंजिरी कुलकर्णी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.राजीव प्रधान, मानद सचिव जयेश पटेल, सचिव खुशाल देढिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय पटेल, सचिव कौशिक शहा,संदीप जव्हेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply