BIG 9 NEWS NETWORK
सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी सोलापूर या योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील 14 स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते तर सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,महापालिका आयुक्त पि. शिवशंकर,माजी आमदार नरसय्या आडम,गटनेते चेतन नरोटे,गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते रियाज खरादी,महेश अण्णा कोठे,नगरसेवक संजय कोळी,नगरसेवक देवेंद्र कोठे,नगरसेवक गणेश वानकर,नगर अभियंता संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.सोलापूर स्मार्ट सिटी च्या वतीने आज 14 स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले ते माझे भाग्यच समजते असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी म्हणाल्या.सोलापूर शहरात आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध कोणीही केलेली नाही.आज स्मार्ट सिटी च्या माध्यमातून हे निधी उपलब्ध झाले आहे.यासाठी मला सर्व पक्षांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही आभार यावेळेला महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मानले. या भूमिपूजनाचे समारोप हे पद्मशाली स्मशानभूमी येथे करण्यात आले.सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी सोलापूर या योजनेअंतर्गत कुमठे स्मशानभूमी, मोदी स्मशानभूमी, मोदी क्रिश्चन समशान भूमी, देगाव मुस्लिम कब्रस्तान स्मशानभूमी, जुना कारंबा नाका स्मशानभूमी, जुना पुना नाका स्मशानभूमी, भावसार स्मशानभूमी, रुपाभवानी रोड लिंगायत स्मशानभूमी, हिंदू रुपा भवानी रोड स्मशानभूमी, अक्कलकोट रोड जडे साहेब मुस्लिम स्मशानभूमी, अक्कलकोट रोड पद्मशाली स्मशान भूमी या सर्व स्मशानभूमी चे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण 22 कोटी रुपये तरतुदी करण्यात आले आहे.या सर्व ठिकाणी प्रवेशद्वार,संरक्षक भिंत, गॅस दाहिनी, स्वच्छता गृह, अंतर्गत काँक्रिटचे रस्ते, सौर पथदिवे, वेटिंग शेड, बोर व पंपसेट बर्निंग शेड, पाण्याची टाकी, पेवर ब्लॉक पथदिवे, प्रेरक करणारे साईन बोर्ड, स्टोअर रूम विद्युत दाहिनी इत्यादी या ठिकाणी करण्यात येणार आहे.यावेळी जनार्दन कारमपुरी,नगरसेवक अविनाश बोंमड्याल, नगरसेवक नागेश वल्याळ नगरसेवक संनगरसेविका रामेश्वरी बिरु नगरसेविका राधिका पोसा, नगरसेविका कुमुद अंकराम, राजू पाटील जनार्दन कारमपुरी अशोक इंदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.