Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

BIG 9 NEWS NETWORK

सोलापूर– दिवाळी सुरु होते ती “वसु – बारस” या दिवसापासून. गाई-वासरंबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाई व वसरासासह पूजा केली जाते. त्याच अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेच्या आवारामध्ये “वसु – बारस” निमित्ताने महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते गो मातेचे व वासराचे पूजन करण्यात आले.यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील,महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी,परिवहन सभापती जय साळुंखे,उपायुक्त धनराज पांडे, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत,नगरसेविका मिनाक्षी कंपली,नगरसेविका संगीता जाधव,नगरसेविका रामेश्वरी,बिरू,नगरसेविका अंबिका पाटील,नगरसेविका निर्मला तांबे,नगरसेविका राजेश्री कणके आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *