Big 9 News Network
आज एक मे, महाराष्ट्र दिनी राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी आपल्याकडे फक्त तीन लाख लसींचा साठा उपलब्ध आहे तरीही उद्यापासूनच लसीकरण सुरू केले जाईल, लसीकरण केंद्रावर गर्दी करून या केंद्रांचे कोरोना प्रसारक मंडळ होऊ नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले होते. शुक्रवारी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
सोलापूर शहरातील मदर तेेेरेसा आरोग्य केंद्र (डफरीन हॉस्पिटल) येथे आज सकाळी सातपासून लसीकरण घेण्यासाठी नागरिकांनी रांगाच्या रांगा लावल्या होत्या. शहरात लस उपलब्ध नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार लोकांची या ठिकाणी गर्दी दिसून आली.
सकाळी सातपासून नागरिकांनी केलेली गर्दी केल्याने आरोग्य कर्मचार्यांची धांदल उडाली. उपस्थित नागरिकांच्यााा रांगा लावण्याचे काम येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले. डॉक्टर 11 वाजता येतात तेव्हा लस मिळेल असे सांगण्यात आल्याने नागरिक रांगेत उभे होते.
यावर विशेष प्रतिनिधीने माहिती विचारली असता येथील उपस्थित स्टाफने या आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नाही असे सांगितले त्यामुळे वैतागून नागरिकांनी आरोग्य केंद्र रिकामे केले. लस नसल्याचेे समजताच नागरिक तेथून निघून गेले.
लस उपलब्ध नाही तर आधीच सांगता येत नाही का येथे येऊन आम्ही काय बाधित होऊ का ?असा सवाल येथील उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलाय.
शहराचे आरोग्य अधिकारी डॉ.बिरु दूधभाते यांचा फोन सतत व्यस्त लागल्याने प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
लसींचा तुटवडा आहे. नागरिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनच माहिती घेऊन लसीकरण केंद्रावर यावे गर्दी केल्यास संसर्ग वाढण्याची भीती आहे. याची काळजी घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे. लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम होणार आहे.
धनराज पांडे, महापालिका उपायुक्त