Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

केवळ 399 रुपयात दहा लाखांचे विमा संरक्षण

  • सोलापूरकरांचा मोठा प्रतिसाद
  • पोस्टाच्या अपघाती विमा योजनेला प्रतिसाद

सोलापूर, 18 : पोस्टाने केवळ ३९९ रुपयात १० लाख रुपयाची अपघात झाल्यानंतर विमा संरक्षण देणारी अपघात विमा योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात योजना सुरु होताच ५०० सदस्यांनी योजनेत सहभाग नोंदवला आहे.

पोस्ट खात्याने टीएजी (टाटा अॅक्सिडेंटल ग्रुप) यांच्या समवेत ही अपघाती विमा योजना मागील पंधरवाड्यात आणली आहे. अपघातावरील विमा संरक्षणासाठी ही योजना विशेष अशी मानली जाते. अपघाताच्या बाबतीत विमा संरक्षण देत असताना त्याबाबतचे अधिक लाभ या कुटुंबियांना मिळणार आहेत. इतर अपघाती विमा योजनेच्या तुलनेत अधिक लाभा देण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे. सुरवातीलाच अत्यंत कमी खर्चातील या विमा योजनेला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. दोनच आठवड्यात जिल्ह्यातील ५०० नागरिकांनी योजनेचा हफ्ता भरला आहे. तर योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे.

योजनेमध्ये समाविष्ठ लाभ..

अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आले तर १० लाखांची भरपाई अपघाताने दवाखान्यात भरती झाल्यास ६० हजारांचा खर्च

अपघातनंतर बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी ३० हजार मदत

दवाखान्यात भरती झाल्यास प्रतिदिन १ हजार रुपये खर्च

मिळणार

अपघातानंतर वाहनाद्वारे ये-जा करण्याचा २५ हजारांची तरतूद अपघाती मृत्यूनंतर एका मुलाच्या शिक्षणासाठी १ लाख रुपये

खर्चाची मदत (दोन मुलापर्यंत मदत मर्यादा) अपघाती मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी तत्काळ ५ हजार मदत

योजनेचा लाभ कसा घ्यावा…

आधी पोस्ट पेमेंट बँकेत आधार कार्डावर खाते उघडावे

•खात्यात ५०० रुपये जमा करावे

डिजिटल बँक खाते असल्याने आधार कार्डाद्वारे व्यवहार •
बँक खात्यातून विमा योजनेचा ३९९ रुपयाचा हफ्ता कपात
• योजनेचे सर्व आर्थिक लाभ पोस्ट पेमेंट बँक खात्यावर मिळणार

-दरवर्षी ३९९ रुपये वार्षिक हफ्ता भरणे बंधनकारक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *