टेम्पोच्या धडकेने पादचारी ठार

BIG 9 NEWS NETWORK

भरधाव वेगात बार्शी दिशेने निघालेल्या टेम्पोची पाठीमागून धडक बसल्याने पादचारी गंभीर जखमी होऊन मरण पावला. वसंत भिमराव पाटील असे मरण पावलेल्या पादचाऱ्याची नाव असून शनिवारी सकाळी साडेआठ वाजता माडा तालुक्यात पापनास येथे रिधोरे पुलाजवळ अपघात झाला. पोलिस सूत्रांकडून माहितीनुसार वसंत पाटील हे नेहमी प्रमाणे पापण असून गावाकडे चालत निघाले होते. त्यांच्या पाठी मागून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पो( एम.एच.12 एल.टी.2904) ची जोराची धडक बसली. या अपघातात वसंत पाटील यांच्या हाताला वांगा ला जबर मार लागला. दरम्यान त्यांच्या पुतण्याला या अपघाताची माहिती मिळाली त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पुतण्या रावसाहेब महादेव तरंगे(वय 28,रा.पापनस,ता.माढा) यांनी टेम्पो चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

अपघातस्थळी दावला पुतण्या

अपघातस्थळी टेम्पो थांबलेला दिसला परंतु चालकाने तेथून पळ काढला होता. त्यामुळे प्रथम पुतण्याने जखमी चुलत्याला बार्शीतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला, शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात आला, गावाकडे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.