Big9 News
छत्तीसगडच्या दंतेवाडा मध्ये नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी जवानांच्या मार्गावर भू सुरंग पेरले होते.आणि नक्षलवादी विरोधी मोहिमेतील हे जवान अरणपूर मार्गे परतत असताना हा भूसुरंगाचे स्फोट घडवण्यात आले . त्यामध्ये दहा जवान आणि वाहनचालक असे एकूण 11 जवान शहीद झाले.
सर्व जवान माईन प्रोटेक्टेड वेहिकल मध्ये होते. मात्र नक्षलींनी घडवलेल्या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती ती माइन प्रोटेक्टेड वेहिकल देखील उडाली. रस्त्याच्या मधोमध भू सरुंग लावल्याने जवानांची गाडी जाताच जोरदार स्फ़ोट झाला. त्यातले दहा जण शहीद झाले काही जणांचा शोध सुरू आहे.गाडीमध्ये जवळपास 30 जवान होते . काही जणांचा अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.