Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

BIG 9 NEWS NETWORK

बार्शी तालुक्यात नारी वाडी शिवारात दरोडा टाकल्याप्रकरणी पांगरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यातील डिझेल,मोबाईल, पाकीट असा चार लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सतीश अच्युत पवार(वय.25 रा.सोनी जवळा, ता.केज,जि. बीड) व आकाश सुदाम पवार(वय 20,रा. बुकनवाडी,ता.जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अक्षय दशरथ चव्हाण(रा.सवडी,ता.करमाळा ) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात 14 हजार 400 रुपयांचे 150 लिटर डिझेल, व फिर्यादीचे पाकीट,मोबाईल,पैसे काढून घेतले होते ते जप्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *