Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

आज देशाचे जाणते नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण श्रद्धेय खासदार मा श्री शरदचंद्र पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्य शहरातील छत्रपती शिवाजी रंगभवन हॉल येथे सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने मुंबई येथील नेहरू सेंटर मध्ये आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

सदर वर्चुअल रॅली मध्ये पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेश अध्यक्ष मा ना जयंत पाटील साहेब,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मा.ना.छगन भुजबळ, मा.ना.नवाब मलिक, खा.अमोल कोल्हे, खा. प्रफुल्ल पटेल, महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि हे सर्व मनोगत सोलापूर शहरचे ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी आणि तिन्ही विधानसभा मतदारसंघतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्चुअल रॅली च्या माध्यमातून ऐकले.

मनोगत पर भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केल्याप्रमाणे आदरणीय साहेब व त्यांच्या पत्नी सौ प्रतिभा काकी यांचादेखील उद्या 13 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याकारणाने दोघांचा एकत्रित सत्कार-सन्मान करण्याची मनीषा व्यक्त केली होती त्यानुसार प्रतिभा काकी नेहरू सेंटर येथे आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी प्रतिभा काकी यांचे औक्षण केले व जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व प्रतिभा काकी यांचा पुष्प हार तसेच साहेबांच्या नावाची नव्याने तयार केलेली प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सोलापुरातील रंगभवन येथे उपस्थित सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात पार पडत असलेल्या सत्कार-सन्मान सोहळ्याला प्रतिसाद दिला. यावेळी शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी दणाणून सोडला याला तिथेच उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तितकाच भरघोस प्रतिसाद दिला.

ह्या नंतर आदरणीय पवार साहेब ह्यांचे मार्गदर्शन पर भाषणा ची सुरवात होताच हॉल मध्ये वर्चुअल रॅली साठी एकत्र जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार साहेब ह्यांचा जय घोषाचे नारे दिले, पवार साहेबांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करतांना महाराष्ट्रात वर्चुअल रॅली च्या माध्यमातून उपस्थित सर्वांना पक्ष संघटन तसेच सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेतून पक्ष संघटन वाढविण्या करीता सर्वांना शुभेछ्या दिल्या.

आदरणीय पवार साहेबांच्या भाषणानंतर सोलापूर शहरातील साहेबांसोबत गेली ५० वर्षे राजकारणात कार्यरत असलेल्या श्री सुभाष पाटणकर, श्री भारत जाधव, श्री एकबोटे, श्री मनोहर सपाटे व श्री कारमपुरी यांचा सत्कार सन्मान महेश अण्णा कोठे, तोफिक शेख, संतोष भाऊ पवार, शंकर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला व साहेबांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

आजच्या या वर्चुअल रॅली ला जेष्ठ नेते महेश गादेकर, दिलीप कोल्हे, सुधीर खरटमल, किसन जाधव सुनिता रोटे, लता ढेरे, जुबेर बागवान, पीर अहमद शेख यांच्यासह सोलापूर शहरचे अनेक प्रदेश पदाधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर उपस्थितांचे आभार शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *