Big9news Network
सध्याच्या आधुनिक काळातही महिला आणि वयात आलेल्या मुली यांच्या संदर्भात आणखी कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी वीरशैव व्हिजनसारख्या सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे यांनी केले.
वीरशैव व्हीजनच्या वतीने श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निक कॉलेज येथे सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन भेट देण्याच्या समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे, सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव राजशेखर बारोळे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर घाळे, शहर अध्यक्ष सिद्धाराम चाबुकस्वार, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य धरणे बोलताना म्हणाले की, वीरशैव व्हिजनने यापूर्वीही आमच्या महाविद्यालयातील अनेक गरीब, गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती, कोविड काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत 3 मोबाईल दिले आणि 15 विद्यार्थिनींचे 6 महिन्यांचे मोबाईल रिचार्ज मोफत करून दिले आहेत. आता सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन देऊन विद्यार्थिनींची महत्वाची सोय केली आहे.
या उपक्रमाकरिता वीरशैव व्हिजनला औषध विक्रेता व समाज सेवक राजशेखर बारोळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले.
याप्रसंगी प्रा. श्रीशैल दुलंगे, प्रा. स्वयंप्रकाश व्यास, प्रा. नवनाथ माने, सचिव संजय साखरे, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजय बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सचिन विभुते, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे आदी उपस्थित होते.
वीरशैव व्हीजनतर्फे सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन भेट देण्याप्रसंगी बसवराज मणुरे, प्राचार्य गजानन धरणे, राजशेखर बारोळे, सिद्धेश्वर घाळे, सिद्धाराम चाबुकस्वार, राजशेखर बुरकुले, आनंद दुलंगे, संजय साखरे, विजय बिराजदार, राजेश नीला
Leave a Reply