सांगोला तालुक्यातील कमलापूर गावातील अमोल किरण आदलिंगे (वय ३०) या जवानाचा कोरोना संसर्गजन्य आजारामुळे बुधवार ७ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्तव्यावर असताना सिक्कीम येथे मयत झाला असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.सन २०१२ साली हैदराबाद येथे तो भारत तिबेट सीमा पोलीस मध्ये भरती झाले होते.
ते सध्या भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याचा मृत्यू झाला, त्याचा अंत्यविधी भारत तिबेट सीमा पोलीस सिक्कीम मध्येच करणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.