Big9news Network
अखंड भारतात हिंदुत्वताची ज्वाला जागृत व्हावी. प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान रहावा. प्रत्येक हिंदू जागृत रहावा. संपूर्ण भारतात हिंदुत्ववादी जागृतीचे कार्य अखंडपणे घडत रहावे याकरिता श्री स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे मनोगत हिंदु राष्ट्रसेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू तेजसूर्य धनंजयभाई देसाई यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी तम्मा शेळके, देविदास गवंडी, स्वामीनाथ बेंद्रे, ऋषिकेश लोणारी, श्री गुरव, अनंत क्षीरसागर, आप्पा गवळी, शिवशंकर स्वामी, राहुल वाडे, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, संजय पवार, इत्यादी उपस्थित होते. फोटो ओळ – धनंजयभाई देसाई यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.