Big9news Network
सोलापूर- बार्शी मुख्य रस्त्याचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. परंतु काम करत असताना वाहनधारकांना, तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांना मोठा त्रास होत आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना नियमाचे पालन केले नसल्याचे दिसून येते.
सोलापूर- बार्शी रस्ता सुरक्षेची काळजी घेतलेली दिसत नाही, कामाचा दर्जा याबाबत संबंधित खात्याने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा या विरोधात निवेदन देऊन आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे स्थानिक नेते संजय पौळ यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिली.
गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याला कोणी वाली नव्हता. त्यामुळे सोलापूर- बार्शी रोड वर प्रवास करणे मोठे कठीण झाले होते. याबद्दल वारंवार स्थानिक ग्रामस्थांनी, सामाजिक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. एकदाचे काम जोमात सुरू झाले. परंतु त्या कामामुळे उडणारी धूळ, रस्त्याच्या एका बाजूला बॅरिकेट्स, रस्ता सुरक्षिततेचे लाल निशाण, यासोबत रस्ता बनवताना नेमून दिलेली रस्त्याची ठराविक जाडी,गुणवत्ता याबाबत तक्रारी निर्माण होत आहेत.
सदरच्या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त होते. त्यामुळे बरेच प्रवासी वेगळ्या मार्गाचा अवलंब करीत होते.परंतु सदरचा रस्त्याचे काम सध्या सुरू असल्याने बऱ्याच प्रवाशांची गैरसोय टळली आहे. परंतु सदरच्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे बॅरिकेट न लावल्याने शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय पौळ चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसुन आले.
त्यांनी बोलताना सांगितले की, उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात सदरच्या रस्त्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते.अशातच सदरच्या कामावर कोणत्याही प्रकारचे बॅरिकेट व कसलीही ठळक अशी खुण नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.सदरच्या कामावर लवकरात लवकर बॅरिकेट अथवा विशेष प्रकारची खुण लवकरात लवकर न केल्यास उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीने सदरचे काम बंद ठेऊन योग्य अशी ठाम भुमिका घेणार असल्याची माहिती शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पौळ यांनी दिली.
Leave a Reply