Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big 9 News Network

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्यकर्ते, माजी नगर सेवक दत्तात्रय सखाराम (उर्फ बंडु कुलकर्णी) यांचे आज दुपारी 3:30 च्या दरम्यान निधन झाले. शासकिय दवाखान्यात ते अगोदर कोविडने आजारी होते. त्यातुन ते बरे झाले म्हणुन त्याना सामान्य वार्ड येथे हलवले होते. गेली 3 ते 4 दिवस त्यांच्या प्रकृतीत चड उतार सुरु होते  शेवटी मृत्युने गाठले.

भाजपाचा प्रामाणिक व कष्टाळू  कार्यकर्ता  म्हणुन त्यांची ओळख होती. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत  प्रचाराचा भाग म्हणौन त्यांच्या प्रभागातील प्रत्येक  मतदांरा पर्यन्त  पोहचणारा  नगरसेवक अशी पण त्यांची कार्यपध्दती होती. ते सोलापूर  महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून होते. ते स्थाई समिती सदस्य पण होते. महापालिकेची  स्थायीची बैठक झाली हे दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात  त्यांनी  घातलेल्या वादविवाद प्रसिध्दीपत्रकात  वाचावयास मिळत होते. ते भारतीय मजदुर संघाचे पण कार्यकर्ते  होते. सोलापूरात रिक्षा संघटना उभी करण्यात त्यांचा वाटा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *