Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

महेश हणमे/ 9890440480

आज सकाळी साधारण सातच्या नंतर पंढरपूर तिऱ्हे मार्गे सोलापूर या प्रवासी वाहतूक बसला एका टँकरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने टॅंकरचे मोठे नुकसान झाले आहे, तर प्रवासी वाहतूक बस दुभाजकावर चढली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज शुक्रवार 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी बी. एम. टी कॉलेज समोर ही दुर्घटना झाली.

      

पंढरपूर तिऱ्हे मार्गे सोलापूर MH -06 S -8314 या प्रवासी वाहतूक बसमधून सोलापूर मंगळवेढा रोडवरील बी. एम. टी कॉलेज समोरील रस्त्यावर प्रवासी उतरत होते. त्यादरम्यान पाठीमागून आलेल्या गाडी नंबर MH12 MO 4209 या हिंदुस्तान पेट्रोलियम टँकरने जोरदार धडक दिली .त्यात टँकरचे मोठे नुकसान झाले असून ड्रायव्हरला थोडीशी दुखापत झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी मदन क्षीरसागर यांनी MH 13 न्यूजला दिली.
पाठीमागून जोराने दिलेल्या धडकेने टॅंकर रस्त्याच्या एका बाजूला गेला, तर एसटी बस दुभाजकावर चढली. पेट्रोलियमचा टँकर हा रिकामा होता अशी माहिती मिळाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *