जाणून घ्या | चिंता वाढली , किती नवे कोरोना रुग्ण वाढले ; सोलापूरसह..

पुणे विभागातील 5 लाख 96 हजार 787 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 6 लाख 29 हजार 850 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 7 :- पुणे विभागातील 5 लाख 96 हजार 787 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 29 हजार 850 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 643 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 420 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.75 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 17 हजार 421 रुग्णांपैकी 3 लाख 94 हजार 896 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 13 हजार 322 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.20 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.60 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 59 हजार 613 रुग्णांपैकी 56 हजार 29 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 728 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 523 रुग्णांपैकी 50 हजार 680 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 990 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 659 रुग्णांपैकी 46 हजार 666 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 231 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 762 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 634 रुग्णांपैकी 48 हजार 516 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 372 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 746 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ.

 

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 294 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 944, सातारा जिल्ह्यात 186, सोलापूर जिल्ह्यात 104, सांगली जिल्ह्यात 26 तर कोल्हापूर जिल्ह्यात 34 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 384 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 235, सातारा जिल्हयामध्ये 23, सोलापूर जिल्हयामध्ये 59, सांगली जिल्हयामध्ये 20 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 47 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 41 लाख 72 हजार 325 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 29 हजार 850 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 6 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

राज्यात आज 11141 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6013 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2068044 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 97983 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.17% झाले आहे.

Today, newly 11141 patients have been tested as positive in the state. Also newly 6013 patients have been cured today. Totally 2068044 patients are cured & discharged from the hospitals.Total Active patients are 97983.The patient recovery rate in the state is 93.17%.

#MeechMazaRakshak
#CoronaVirusUpdates