Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

शहर – 234 रुग्ण

सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाचे 234 रुग्ण आढळले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज रविवारी दि.16 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 234 रुग्ण आढळले असून यामध्ये 139 पुरुष तर 95 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 1051 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 817 निगेटीव्ह तर 234 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 11 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 1 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30,757 असून एकूण मृतांची संख्या 1465 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 1196 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 28,096 इतकी आहे.

ग्रामीण – 243 रुग्ण

ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढतोय.आज एकूण तपासणी अहवाल 1107 आले असून
त्यापैकी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 243 इतकी आहे. दिलासादायक बाब म्हणजे 45 बाधित बरे झाले असून
एकही रुग्ण मृत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण भागात एकूण ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 1106 इतकी झाली आहे.

लसीकरण…

15 ते 18 वर्षातील 47 हजार 181 पात्र व्यक्ती आहेत.
18 वर्षावरील 6 लाख 85 हजार 882 व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.

महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत नागरिकांनी आजारपण अंगावर काढू नये. वृद्धांची काळजी घ्यावी. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे, मास्क वापर करावा अशा सूचना देण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *