माजी सरपंचांच्या पुण्यस्मरणार्थ विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

Big9news Network

मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगाव चे माजी सरपंच कै अप्पासाहेब सिद्राम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शेज बाभुळगाव येथील विविध कार्यक्रम अंतर्गत रक्तदान शिबिरात 101 जणांनी रक्तदान केले तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खेळाचे साहित्य वाटप करून अंकोली येथील भैरवनाथ विद्यालय मध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप करण्यात आले.

तसेच गावातील विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी आमदार राजन पाटील ,आमदार यशवंत माने ,बाबासाहेब क्षिरसागर महेश , थोबडे शिवाजी सोनवणे, माऊली चव्हाण शेजबाभुळगावचे सरपंच दीपक गवळी ,विजयकुमार घोंगडे ,राजकुमार पाटील ,अमोल कस्तुरे ,नाना रणदिवे विविध क्षेत्रातील भाऊंचे प्रेमी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते कोरोना चे नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला