Big9news Network
प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रोत्सवानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी यंदाही ‘मैत्रीण’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अक्कनबळग महिला मंडळाच्या ट्रस्ट अध्यक्षा सुरेखा बावी यांनी दिली.
कस्तुरबा मार्केट जवळील लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे दिनांक 23 व 24 ऑक्टोबर असे दोन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत दिवस हे प्रदर्शन चालणार आहे.
या प्रदर्शनात महिलांनी बनवलेल्या वस्तू प्रदर्शनास व विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये वस्त्र, सौंदर्यप्रसाधने, दागिने, गिफ्ट आर्टिकल्स, लेटेस्ट गारमेंट्स, विविध प्रकारच्या साड्या, अँटिक इमिटेशन ज्वेलरी, दसरा-दिवाळी करता आकाशदिवे, डेकोरेटिव्ह दिवे रांगोळी पॅटर्न, गृहोपयोगी वस्तू आणि फूड झोन यांचे स्टॉल उपलब्ध राहणार आहे.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अक्कनबळग महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी आणि सदस्या परिश्रम घेत आहेत.
Leave a Reply