चक्क..कवड्यांवर साकारली देवीची साडेतीन शक्तीपीठे

Big9news Network

कवड्यांवर साकारली देवीची साडेतीन शक्तीपीठे

चित्रकार मल्लिनाथ जमखंडी यांचा कलाविष्कार

विविध सण, उत्सव, पुण्यतिथी आणि जयंतीदिनी आपल्या कलेद्वारे अभिनव पद्धतीने अभिवादन करणारे दमाणी विद्या मंदिर येथील कलाशिक्षक व चित्रकार मल्लिनाथ जमखंडी यांनी नवरात्रीनिमित्त कवड्यांवर देवीची रूपे साकारली आहेत.(solapur )MH 13News

 

पूर्वीच्या काळी कवडी हे वस्तु विनिमयाचे पैशाचे साधन होते. कवडी लोकसाहित्य व लोकसंस्कृती च्या दृष्टीने सांस्कृतिक महत्त्व असणारे प्रतीक कवड्याची माळ ही अंबाप्रिय वस्तु आहे देवीच्या उपासनेत कवडीला असाधारण महत्व आहे. कवडी हे वांझपणाचे निराकरण करण्यासाठी वापरली जाते.

कवड्यांमध्ये सर्व प्रकारच्या अनिष्टांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य असल्यानेच छत्रपती शिवरायांनी तिला वंद्य मानले होते. म्हणूनच ते मोहिमेवर जाण्यापूर्वी अथवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयापूर्वी कवड्यांच्या माळेला वंदन करून जगदंब जगदंब असा उच्चार करत.

तुळजापूर येथील कवडी माळेत ६४ कवड्या असतात. या कवड्या ६४ कलांचे प्रतिक आहेत असे मानले जाते म्हणूनच अंबाप्रिय आणि कलेच्या उपासकांसाठी वंद्य असणाऱ्या कवड्यांवर कलाशिक्षक मल्लिनाथ जमखंडी यांनी तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी , करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी, सप्तशृंग निवासिनी श्री सप्तशृंगी व सौंदत्तीची रेणुका यल्लमा देवी व दुर्गा देवीची चित्रे साकारली आहेत.

ॲक्रॅलिक रंग या माध्यमाचा वापर करून देवीची साडेतीन शक्तीपीठे साकारली आहेत. यासाठी तीन तास अवधी लागला असून सर्वात लहान कुंचल्याचा वापर केला आहे.