रघोजी हॉस्पिटल येथे नवीन हृदयरोग व हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग होणार सुरू ; रविवारी शुभारंभ

Big9news Network

रघोजी किडनी अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सोलापूर येथे नवीन हृदयरोग व हृदयरोग शस्त्रक्रिया विभागचा शुभारंभ रविवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होत असल्याची माहिती डॉक्टर विजय रघोजी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

या रुग्णालयात अद्ययावत हृदयरोग व हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येत आहे या विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अलेन्जर अल्टीमा 100 कॅथ लॅब उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन केईएम हॉस्पिटल मुंबई येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय महाजन व सायन हॉस्पिटल मुंबई येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर पी. जे नाथाणी यांच्या शुभहस्ते संपन्न होईल.

अलेंन्जर अल्टीमा 100 कॅथ लॅब द्वारे हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची सूक्ष्म निरीक्षण (अँजिओग्राफी)करून योग्य निदान व उपचार अत्यंत कमी वेळेत करू शकतो असे प्रतिपादन या विभागाचे प्रमुख डॉक्टर दिपक गायकवाड-पाटील यांनी सांगितले आहे.

डॉक्टर दिपक गायकवाड-पाटील हे एमडी ,डीएनबी मेडिसिन व डीएम काहि लॉजी म्हणून विशेष प्राविण्य प्राप्त आहेत . महाराष्ट्र शासनाचे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत लवकरच उपचारासाठी हे रुग्णालय मान्यता प्राप्त होणार आहे अशी माहिती डॉक्टर विजय रघोजी यांनी दिली.

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, प्रायमरी अँजिओप्लास्टी,बलून अँजिओप्लास्टी,तसेच हृदय बायपास शस्त्रक्रिया , हृदयाच्या झडपांचे आजार आणि कार्डियाक पेसमेकर इत्यादी सुविधा उपल्बध करण्यात आल्या आहेत, त्यासाठी आवश्यक हार्ट लंग मशीन आणि इतर सर्व तपासण्या देखील उपलब्ध करण्यात आले आहेत.

रघोजी किडनी अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे ३ मोडुलर ऑपरेशन थिएटर,डॉर्नियर सिग्मा लिथोट्रिप्सी , थूलियम लेसर थेरपी ,होलियम याग लेसर , सिटीस्कॅन ,डिजिटल एक्स-रे,१० बेडचे आय सी यू , १० बेडचे डायलेसिस ,२४ तास तातडीची सेवा,२४ तास पॅथॉलॉजी ,२४ तास फार्मसी , प्रशस्त सुपर डीलक्स, डीलक्स रुम , ६ जनरल वॉर्ड,सेंट्रल ऑक्सिजन युनिट सेवा आदी उपलब्ध असल्याने रुग्णांना जवळपास सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली मिळतील असे डॉक्टर संध्या रघोजी मॅडम यांनी सांगितले आहे .

रघोजी हॉस्पिटल हे केंद्र सरकार व राज्य सरकार मान्यताप्राप्त हॉस्पिटल असून येथे महाराष्ट्र शासनाचे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सह कर्नाटक येथील वाजपेयी आरोग्य योजना व इतर पन्नासहून जास्त कॉर्पोरेट कंपन्यांचे कॅशलेस ट्रेंटमेंटसाठी उपलब्ध आहेत.

या पत्रकार परिषदेत डॉ.दीपक गायकवाड-पाटील, निहारीका रघोजी, गजानन पिलगुलवार, सुनील कुमार, जगदीश नालवार आदी उपस्थित होते