बस्स 2 मिनिट ! सोलापूरकरांनो व्हा व्यक्त ; खड्ड्यात रस्ता,पाणी, विमान,चिमणी..

Big9News Network

सोलापुरातील नागरिकांनो व्यक्त व्हा असे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे. शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुर विकास मंच सोशल मीडियावर अनेक प्रश्नांच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. सोलापूरकरांना सोमवारी दि 30 ऑगस्ट रोजी आपले विचार मांडता येणार आहेत अशी माहिती संयोजक योगिन गुर्जर यांनी दिली.

आता महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. इच्छुक उमेदवार दिसायला लागतील. दिवसेंदिवस सोलापूरची अवस्था वाईटातुन वाईट होत चालली आहे. आपली मुलं नोकरीसाठी सोलापूर कायमस्वरूपी सोडुन चालली आहेत.

याची आमच्या लोकप्रतिनिधींना खेद ना खंत. या पार्श्वभूमीवर *सोलापुर विकास मंच* व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

समस्यांचा डोंगर..

रस्त्यावरील खड्डे की खड्ड्यात रस्ता, पिण्याच्या पाण्याचा उडालेला बोजवारा,वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य, स्मार्ट सिटीच्या कामामुळे शहरभर खोदलेले रस्ते, कामाचा दर्जा, विमान सेवा,चिमणी प्रश्न, पिण्याची पाईपलाईन ,ड्रेनेज लाईन समस्या, स्वच्छता अशा अनेक प्रश्नांवर उद्या नागरिक बोलणार आहेत.

सोलापूर शहर परिसरातून तरुण-तरुणींचे होणारे ब्रेन ड्रेन, स्थलांतर ,रोजगारांच्या समस्या या विषयावर चर्चा होऊ शकते.

  • स्थळ:-समाज कल्याण केंद्र हॉल, रंगभवन चौक, सोलापूर
  • कधी:- सोमवार, ३० ऑगस्ट २०२१
  • वेळ :- *सकाळी ठिक १०.३० वाजता

प्रत्येकाला बोलण्यासाठी दोन मिनिटे दिली जातील .यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. असेही संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे