सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित ‘राष्ट्रवादी प्रभाग संवाद’ यात्रा
येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात राष्ट्रवादी संवाद यात्रा निमित्त नियोजन करण्यासाठीची महत्वाची बैठक आज रोजी संपन्न झाली.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल, सर्व प्रमुख सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक आज कै.सुभद्राई मंगल कार्यालय येथे शहराध्यक्ष भारत जाधव व शहर कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली माजी महापौर महेश अण्णा कोठे व नगरसेवक तौफिक शेख यांच्या विशेष तसेच प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, माजी महापौर सुभाष पाटणकर, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे, परिवहन माजी सभापती राजन जाधव, महिला अध्यक्ष (नगरसेविका) सुनिता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान आदी तसेच इतर ज्येष्ठ नेते, प्रांतिक सदस्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली.
या बैठकीत मार्गदर्शनपर भाषण करताना शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे – राजन जाधव – सुभाष पाटणकर, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, सेवादल शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, ज्येष्ठ महिला लताताई फुटाणे, महिला शहराध्यक्ष सुनिताताई रोटे, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार तसेच विद्यार्थी शहर अध्यक्ष निशांत सावळे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर (मुन्ना) शेख, दादाराव रोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पाच सप्टेंबर पासून शहरातील सकाळ व संध्याकाळ 26 प्रभागात 13 दिवस प्रभाग संवाद
या बैठकीत येत्या पाच सप्टेंबर पासून शहरातील सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळी एकूण 26 प्रभागात तेरा दिवस प्रभाग संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून त्याची प्रमुख जबाबदारी शहर मध्य, उत्तर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष यांच्यावर सोपविण्यात आली असून नियोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम अंतर्गत त्या – त्या प्रभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील. यावेळी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व जेष्ठ नेते, प्रांतिक सदस्य व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष हे त्याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असतील.
सोलापूर महानगर पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी परिवार या नियोजनात्मक प्रभाग संवाद यात्रेच्या आयोजनात जूटला असून संपूर्ण शहर त्यानिमित्ताने राष्ट्रवादीमय करण्याचा मानस यावेळी प्रत्येकांनी व्यक्त केला.
बैठकीला तिन्ही विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, प्रकाश जाधव, तनवीर गुलजार, ज्येष्ठ नेते दिनेश शिंदे, जावेद खैरादी, अजित बनसोडे, युवक प्रदेश पदाधिकारी चेतन गायकवाड, युवती शहराध्यक्ष आरती हुल्ले, सर्व महिला पदाधिकारी, सेल पदाधिकारी – गोवर्धन सुंचू, महिपती पवार, सोमनाथ शिंदे, आशुतोष नाटकर, नागेश निंबाळकर, शिवाजी मंगोडेकर, प्रमोद भोसले, मनीषा माने, लता ढेरे, रुपेश भोसले आदी व इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते
बैठकीच्या सुरुवातीला निवड जाहीर करत राजू कुरेशी आणि गोविंद एकबोटे यांना शहर उपाध्यक्ष, बशीर चाचा शेख यांची जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती करून सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या नूतन नियुक्त शहर अध्यक्ष गफुर शेख, कार्याध्यक्ष सर्फराज शेख, प्रदेश महासचिव फारूक मटके यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आणि आभार प्रकाश जाधव यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी प्रभाग संवाद यात्रेसाठी आयोजित आजच्या बैठकीला प्रसनजीत (लकी) गायकवाड, बसवराज कोळी, वंदना भिसे, अश्विनी भोसले, चित्रा कदम, सुनिता खडसळ,सिया मुलाणी, मीनाक्षी कांबळे, अलामराज आबादिराजे, जब्बार मुर्शद, युंनुस सय्यद, अनिल उकरंडे, किशोर चव्हाण, इरफान शेख, अनिल बनसोडे, रियाझ मोमीन, अजिंक्य शिंदे, शिवराज विभुते, गौरा कोरे, रेखा ताई सपाटे, कांता बनसोडे, शशिकला कास्पटे, खांडेकर ताई, मिलिंद गोरे, श्रीमंत चव्हाण हे पदाधिकारी देखील हजर होते
बैठकीच्या नंतर हे राष्ट्रवादीचे चित्रपट कला सांस्कृतिक सेलचे कार्याध्यक्ष जब्बार मुर्षद तसेच त्यांचे संगीत साथीदार धनंजय यांना दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार २०२१ मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.