Latest Post

“1win Casino Resmi Site, Bahis Ofisi, Slotlar, Oyun Makineler ️ 1win En Côte D’ivoire ᐈ Rome Sportifs Et Sobre Casi

Big9news Network

सोलापूर – परिशिष्ट सर्वे नंबर प.भू.क्र .५ फा.प्लॉ . IV गट नंबर नगरभूमापन ४४/१ मिळकत अंदाजे तीस हजार चौरस मीटर नियोजित जागेवरील क्र .५ हे भूखंड जलसंपदा विभागाचे असून या जागेवर सध्या मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था , सोलापूर यांनी त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी ही जागा अतिक्रमण करुन, त्या ठिकाणी जाळीचे कंपौड मारण्यात आलेले असून ही जागा बेकायदेशीररित्या बळकावण्यात आलेली आहे.

तरी सदरहु जागा ही आपल्या कार्यालयामार्फत कोणत्या संस्थेला जागा दिलेली नसल्याचे समजले आहे. तरी सदर जागेवर अतिक्रमण करुन संस्थेच्या नावाचे बोर्ड लावण्यात येऊन ही जागा बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थापकावर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी अन्यथा याबाबत मोठ्याप्रमाणावर जन आंदोलन करण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी असा ईशारा नगरसेविका स्वाती समाधान आवळे यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपअभियंता व जनसंपर्क अधिकारी व आयुक्त पी.शिवशंकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी सकल मातंग समाज शहर जिल्हाध्यक्ष सुहास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, उपाध्यक्ष दिलीप खंदारे, DPI प्रदेश अध्यक्ष सोहन लोंढे ,दयानंद शिंदे विकास कसबे ऋषिकेश शिंदे मनोज लोंढे, विष्णू जाधव, विकास कसबे, उमेश काळे, नामदेव भोसले आदीजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *