महत्त्वाचे | सप्टेंबरमध्ये तब्बल 12 दिवस बँका असणार बंद

Big9news Network

ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये अनेक सण असल्याने बँकांना बऱ्याच सुट्या मिळतात. बँका बंद असल्यास अनेक कामे खोळंबतात. सप्टेंबरमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार असून, त्यादृष्टीने कामांचे नियोजन केल्यास अडचण होणार नाही. बँका बंद असल्याने आर्थिक व्यवहारात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र एटीएम मध्ये पैशांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात १२ दिवस बँक बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्यांचा देखील समावेश आहे. सप्टेंबरमध्ये एकूण ६ साप्ताहिक सुट्या राहणार आहेत. इतर सुट्या या प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या असतात. त्यानुसार महाराष्ट्रातील बँका ७ दिवस बंद राहणार आहेत.

या तारखांना बँकांना सुटी – 

महाराष्ट्रात ५, १०, ११, १२, १९, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत, १० सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्यानंतर दुसरा शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस बँका बंद राहतील, तर २५ आणि २६ तारखांना चौथा शनिवार आणि रविवार असल्याने सलग दोन दिवस बँका बंद राहतील.