सोलापूर | शुक्रवारी शहरातील ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

Big9news Network

सोलापूर शहरातील लसीकरण वेळेवर होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा पर्याय आहे, परंतु वेळेवर लसीकरण उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

उद्या शुक्रवारी शहरातील या केंद्रावर लसीकरण होणार आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. –

 

महत्त्वाचे :-

कोव्हिड 19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी कोव्हॅक्सीन अथवा कोव्हिशिल्ड लसीचे 2 डोस घेणे गरजेचे आहे. कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच लसीचा दुसरा डोस आवश्य घ्यावा तसेच कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसानंतर त्याच लसीचा दुसरा डोस आवश्य घ्यावा. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतल्यानंतरच कोव्हिड 19 आजाराविरुद्ध लढण्यासाठी अपेक्षित प्रतिकार शक्ती प्राप्त होते. अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.