Big9news Network
सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 30 जण बरे झाले तर एकही मृत्यू नाही.
सोलापूर शहरात आज शनिवारी दि.19 जून रोजी कोरोनाचे नवे 4 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 1 स्त्रियांचा समावेश आहे.
आज एकूण 1204 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1013 निगेटिव्ह तर 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 30 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज एकही जणांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.