Month: August 2022
-

सरांनी ‘भाऊं’ना पुरवली ताकद | माजी शहराध्यक्ष शिवसेनेच्या (शिंदे सेनेच्या )उपजिल्हाप्रमुख पदी
सोलापूर शहरातील शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष हरिदास धनाजी चौगुले यांची नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे. शिवसेनेच्या सचिवांनी त्यांची निवड केली असल्याचे पत्र आज बुधवारी देण्यात आले. यावेळी शिंदे गटात नव्याने प्रवेश केलेले पदाधिकारी उपस्थित होते. हरिदास चौगुले यांची शिवसेना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी (कार्यक्षेत्र- सोलापूर शहर तालुका उत्तर सोलापूर, मंगळवेढा) नियुक्ती…
-

(शिव)शिंदेंसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी मनीष काळजे ,अमोल शिंदे
सोलापुरातील शिंदेसेनेच्या (शिवसेनेच्या) जिल्हा प्रमुख पदी मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र आज बुधवारी देण्यात आले.शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले असून राज्यात मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा सोलापुरातील मनीष काळजे यांच्या कार्यालयाला…
-

स्तुत्य उपक्रम | शालेय विद्यार्थ्यांना ५००० वह्यांचे वितरण ; विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानने जपली सामाजिक जाणिव
शालेय विद्यार्थ्यांना ५००० वह्यांचे वाटप:- विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानचा उपक्रम स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या ८५ वी जयंती व आजादी का अमृत महोत्सव औचित्य साधून विष्णूपंत कोठे प्रतिष्ठान व राजेश अण्णा कोठे गणेशोत्सव मंडळ वतिने शालेय विद्यार्थ्यांना ५००० वह्यांचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अभिमान श्रीनगर येथील लोकमंगल माध्यमिक प्रशाला या ठिकाणी ह.भ.प सुधाकर इंगळे…
-

राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 23 : अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करू, असे उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २६० अन्वये राज्यातील कृषी क्षेत्र आणि पूरपरिस्थिती यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. २२ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये सततचा पूर, अतिवृष्टी यामुळे ८१ लाख…
-

रडायचं नाही ,लढायचं ; छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया! – मुख्यमंत्री शिंदे यांची शेतकऱ्यांना भावनिक साद
मुंबई दि. 23 : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना उद्देशून…
-

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम 1ऑगस्ट 2022 पासून राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवून आधार क्रमांक मतदान ओळखपत्राशी जोडून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी आज सांगोला आणि मंगळवेढा तालुका दौरा केला. सांगोला तालुक्यातील वाकी, घेरडी येथील मतदान…
-

सायकल बँक | CEO स्वामींच्या आयडियाला मोठा प्रतिसाद ; 75 सायकलींचे वाटप..
पंढरपूर पंचायत समिती अधिकारी व कर्मचार्यांकडून विद्यार्थीनींना 75 सायकलचे वाटप जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आयोजन पंढरपूर – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या सायकल बँक उपक्रमांतर्गत पंचायत समिती पंढरपूरच्या अधिकारी व कर्मचार्यांनी विद्यार्थीनींना 75 सायकलचे वाटप केले. पंचायत समितीच्या…
-

मी मोबाईल बोलतोय..! वाचा, तो काय म्हणतोय..!!
मी मोबाईल बोलतोय..! नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, मी मोबाईल बोलतोय…! होय, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, मनातलं काही सांगायचं आहे. तुमच्याशी संवाद साधायचं आहे. माझा शोध लागला, मी पृथ्वीवर आलो आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तुम्हाला आठवत असतील टेलिग्राम आणि टेलिफोनचे ते दिवस ! या नंतर सुरुवात झाली ‘पेजर’ च्या दुनियेला आणि नंतर…
-

कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत संधी …
राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पुरस्कार दिले जातात. यावर्षीही इच्छुकांनी कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषीभूषण सेंद्रिय…
-

जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये राहूल तिवाडीला तिहेरी मुकूट
स्वतः लक्ष घालून जिल्हा क्रीडा संकुलातील समस्या सोडविणार – प्रणिती शिंदे सोलापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या आंतरजिल्हा स्पर्धांसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सोलापूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेकडून घेण्यात येणारी अजिंक्यपद स्पर्धा दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर दिनांक 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान सोलापूर येथे बॅडमिंटनची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. जिल्हा क्रीडासंकुल येथे या स्पर्धांचे नियोजन करण्यात…