Month: August 2022
-
मासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
सांगोला : ग्रामसेवकाने स्वतःसाठी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासाठी एकुण 2 हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनाही ताब्यात घेण्याची घटना सांगोला पंचायत समिती येथे बुधवारी 24 ऑगस्ट रोजी घडली आहे.पंधराव्या वित्त आयोगामधून पाईपलाईन केलेल्या कामाचे बिल मंजुर करुन घेण्यासाठी लाच मागितली होती. या दोघांना…
-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड
सोलापुरातील नेते राजाभाऊ सरवदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. शुक्रवारी राजाभाऊ सरवदे यांचा 65 वा वाढदिवस असून पक्षाने ही मोठी जबाबदारी दिल्याने त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोलापुरातील त्यांच्या कार्यकर्ते…
-
‘भरत’ सोलापुरात परत ; ‘सही रे सही’ नाटकाला वीस वर्षे पूर्ण..
भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्ण मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक पुन्हा सही रे सही हे 15 ऑगस्ट 2002 ला रंगमंचावर आले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून गेली वीस वर्षे अभिनेते भरत जाधव हे या नाटकात पंचरंगी भूमिका करत आहेत. वीस वर्षापासून चालू असलेले नाटक आजही प्रेक्षकांना…
-
रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पूनर्वसन करा -आ. प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासीयांचे पूनर्वसन करा आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी महत्वाचा धोरणात्मक निर्णय आहे याकरीता बैठक लावू . मुख्यमंत्री मुंबई : आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरामधील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी वासीय कुटुंबियांना मोबदला व त्यांचे पूनर्वसन करण्याकरीता महाराष्ट्राचे. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची…
-
महावितरण कार्यालयात नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे
आ. सुभाष देशमुख यांची थेट अधिवेशनात तक्रार सोलापूर (प्रतिनिधी ) पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच गाजला. अनेक वादग्रस्त मुद्दे बुधवारी उपस्थित करण्यात आली आहे. आ. सुभाष देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगरमधील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचं चित्र असणारं पेपरवेट दाखवून चाळे करत असल्याची तक्रार करत संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करावे अशी…
-
पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे खुन प्रकरणी तिघांची उच्च न्यायालयाचा ‘निकाल’
*पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे खुन प्रकरणी तिघांची उच्च न्यायालयात निर्दोष मुक्तता* मुंबई दि. पंचायत समिती कुंभारी गटाचे तत्कालीन सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या खुन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 1) प्रमोद उर्फ किंगभाई प्रकाश स्वामी रा. रामवाडी सोलापूर 2) जगदीश उर्फ पिंटु रत्नाकर कान्हेरीकर रा. मसरे गल्ली सोलापूर 3) प्रदीप उर्फ दिपक प्रभाकर मठपती रा. शेळगी…
-
माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर ,परंतु…
माजी भा.ज.प. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर : मात्र 26 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश सोलापूर दि:- एका महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी आपणास अटक होईल या भीतीने माजी भा.ज.प जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर होऊन त्यांनी श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…
-
आता..आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक ;विद्यापीठास तीन लाखांची देणगी
सोलापूर, दि.24- येथील ज्येष्ठ वास्तुविशारद व्ही. टी.कोटा यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास आर्किटेक्चरच्या सुवर्णपदकासाठी तीन लाख पंधरा हजार रुपयांची देणगी बुधवारी देण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेऊन व्ही. टी. कोटा यांचे पुत्र अतुल कोटा आणि नातू अमेय कोटा यांनी तीन लाख पंधरा हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. आता…
-
ग्रामीण अर्थचक्र फिरणार ! महोत्सव रानभाज्यांचा ; कडवंची, तांदुळसा रानभाज्यासाठी कर्मचारी यांची झुंबड…
सोलापूर – जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी व सहकारी अधिकारी व कर्मचारी रानभाज्यांचा आस्वाद घेऊन बचतगटांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील पार्कींग मध्ये रानभाज्या घेणे साठी झुंबड उडाली होती. जिल्हा परिषदेत आज पासून दोन दिवस रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. घेऊन…
-
सायकल बँक | मुलाच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य कर्मचाऱ्याची ‘सायकल’ भेट
मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजादी महोत्सव व रक्षाबंधन भेट म्हणून एका विद्यार्थिनीस सायकल भेट देण्यात आली. मोहोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञाने अशा पद्धतीने सामाजिक जाणीव जपली. श्री दिलीप स्वामी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी आझादी अमृत महोत्सवनिमीत्त व रक्षाबंधन भेट म्हणून मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल बँकेस सायकल देणेबाबत आवाहन केलेनुसार…