रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पूनर्वसन करा -आ. प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
161
  • रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासीयांचे पूनर्वसन करा
    आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
  • महत्वाचा धोरणात्मक निर्णय आहे याकरीता बैठक लावू . मुख्यमंत्री

मुंबई : आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरामधील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी वासीय कुटुंबियांना मोबदला व त्यांचे पूनर्वसन करण्याकरीता महाराष्ट्राचे. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे  यांची भेट घेवून यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.

यामध्ये सोलापूर शहरामध्ये रेल्वेच्या जमिनीवरील गरीबी हटाव नं. 1 व 2 व इतर ठिकाणी मोठ्याप्रमाणात झोपडपट्टी निर्माण झालेली आहे. सदर झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरीक राहत आहेत. सदर ठिकाणी गोर-गरीब, बांधकाम कामगार, विडी कामगार व इतर कामगार राहत असून त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रोजंदारीवर अवलंबून आहे. सदर भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाईप लाईन, लाईट इ. सोयी-सुविधा पुरविण्यात आलेले आहेत. तसेच तेथील रहिवाश्यांकडून महानगरपालिका टॅक्स घेत असून त्यांना लाईट बिल पण भरावे लागत आहे. या भागातील नागरीकांना रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. यामुळे तेथील कुटुंबिय बेघर होणार असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदर रहिवाश्यांचे पुर्नवसन करणे व त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे  यांची भेट घेवून यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.

सदर प्रश्नावर मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे  यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी वासीयांचा विषय गंभीर असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. याकरीता लवकरात लवकर संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.