माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर ,परंतु…

0
166

माजी भा.ज.प. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर : मात्र 26 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

सोलापूर दि:- एका महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी आपणास अटक होईल या भीतीने माजी भा.ज.प जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर होऊन त्यांनी श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, त्यावर अर्जदारांच्या वकिलांनी सदर अर्जाच्या निकालाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करावयाचा असल्याने अर्जदारास अंतरिम जामीन देण्यात यावा असा मुद्दा मांडला त्या पृष्ठयार्थ उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले, ते ग्राह्य धरून न्यायाधीशांनी श्रीकांत देशमुख यांस 26 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश पारित केले.

यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे एडवोकेट आशिष गायकवाड मुंबई एडवोकेट बाबासाहेब जाधव ऍडव्होकेट विनोद सूर्यवंशी एडवोकेट अभिजीत इटकर ऍडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ऍड.प्रदीपसिंह रजपूत यांनी तर मूळफिर्यादीतर्फे विद्यावंत पांढरे यांनी काम पाहिले.