Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आज रात्री आठ पासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत .या पार्श्वभूमीवर पुन्हा जिल्हा बंदी करण्यात आली असून सर्वसामान्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनापरवाना प्रवास करता येणार नाही.

बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासी वाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येणार. त्यासाठी ड्रायव्हरसह प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मर्यादा राहील. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासीवाहतूक करता येणार नाही.
तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्कीय आपत्कालीन प्रसंग, अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असतील तरच यासारख्या परिस्थितीत आंतरजिल्हा ,आंतरशहर प्रवासाला परवानगी देण्यात येणार आहे. या आदेशांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड करण्यात येईल.

खासगी प्रवासी बसगाड्या आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी घेऊन जाऊ शकतील पण उभे राहून प्रवास करणारे प्रवासी घ्यायला परवानगी नाही.

आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवास करण्यासाठी खासगी बसगाड्यांसाठी या आहेत अटी..

१.  बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.

२.  सर्व थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईनचा ठळक शिक्का हातावर मारावा लागेल आणि हे शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.
३. अशा बस मधून येणाऱ्या प्रवाशांची अँटीजन तपासणी करावी
४. स्थानिक प्रशासन सांगेल त्या ठिकाणी बस घेऊन अँटीजन तपासणीसाठी जावे लागेल. तपासणीचा खर्च बस ऑपरेटर किंवा प्रवाशांकडून वसूल केला जाईल.
५.नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल परत-परत नियम मोडल्यास कोरोना संपेपर्यंत लायसन्स जप्त केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *