Big9news Network
पुरुषोत्तम लक्ष्मणदास भारतद्वाज उर्फ शर्मा,वय:-74, नागेंद्र तेजू यादव,वय:-46,दोघे रा:- खुपरी, ता:-वाडा,जिल्हा:-पालघर यांना जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती यु. एल.जोशी यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की,
दि:-13/10/2021 रोजी पुणे नाका येथील आकांक्षा लॉजिस्टिक या खाजगी बस पार्किंगचे मोकळ्या जागेत टँकर मधून बसमध्ये डिझेल सदृश्य पदार्थ भरीत असताना पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला होता. सदर छाप्या दरम्यान पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली होती. सदरचा डिझेल सदृश्य पदार्थ हा अर्जदार पुरुषोत्तम शर्मा यांच्या खुपरी ता.वाडा येथील कंपनीतून आणल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. त्यावरून कंपनी मालक शर्मा व मॅनेजर यादव यांना अटक केली होती.
दोघांनी ऍड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस अर्जदारांनी बेस ऑईल विक्री केली असून त्याबाबचे साठवणूक व विक्री करण्याचे परवाने हे सादर केले तसेच अर्जदार हा वयस्क असून तो कोठेही पळून जाणार नाही,असे मुद्दे मांडले त्यावरून न्यायाधीशांनी 15000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर अर्जदारांचा जामीन मंजूर केला.
Leave a Reply