Big9News Network
आपल्यातल्या अनेक लोकांना शरीरावर चामखीळ असतेच आणि फावल्या वेळेत त्याला दाबून बघणे ते घालवण्याचे प्रयत्न आपल्या पैकी अनेकजण करत असतीलच. शक्यतो मानेच्या बाजूला, मानेच्या मागे, चेहऱ्यावर, पाठीवर चामखीळ असतात. ही चामखीळ काढण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो किंवा क्रीम लावतो परंतु,काही घरगुती उपाय केल्याने सुद्धा चामखीळ काढली जाऊ शकते.
शरीरातील ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे अंगावर हे चामखीळ येतात. शरिरासाठी त्याचा काहीच धोका नसतो, मात्र आपल्या शरिराची सुंदरता बाद करण्यात पुढे असतात. आपण चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतो.
.असा करा उपाय...
सफरचंदचं व्हिनेगर: चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर ठरतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने चिमखिळीवर हे व्हिनेगार लावा. काही दिवसातच चामखिळीचा रंग बदलून ते नष्ट होईल.
लिंबाचा रस: लिंबाचा रस चामखिळीवर लावल्याने देखील याची समस्या दूर होते.
बटाट्याचा रस
बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते.
अननसाचा रस: चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करुन लावावे.
बेकिंग सोडा
चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीवर देखील फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर ती पेस्ट लावा.
लसून:
लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या बारीक ठेचून ते चामखिळीवर लावा