अकलुज परिसरात सुटया स्वरुपात कमी प्रतिचे दुध विक्री होत असल्याची माहिती प्राप्त – झाल्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने दिनांक २३/०२०/२०११ रोजी अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे किरकोळ स्वरूपात लूज दूध विक्रेत्यां आस्थापनाविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर विशेष मोहिमेअंतर्गत अकलूज येथील लुज स्वरुपात किरकोळ दुध विक्री करीत असलेल्या १४ आस्थापनांवर अचानक धाडी टाकण्यात आल्या. सदर मोहिमेअंतर्गत विविध आस्थापनांतुन दुध या अन्न पदार्थाचे १६ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. सदर नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ नुसार पुढील कायदेशीर कारवाई घेण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांनी सांगितलेले आहे.
सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अन्न • सुरक्षा अधिकारी श्री. भारत भोसले, श्रीमती नसरिन मुजावर, श्रीमती प्रज्ञा सुरसे, श्री. योगेश देशमुख, श्री. मंगेश लवटे, श्री. उमेश भुसे व श्री. प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने पुर्ण केली.
Leave a Reply