- Big9news Network
- आज दि.24 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 748 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज सोमवारी 24 मे रोजी ग्रामीण भागातील 748 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 408 पुरुष तर 340 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2234 आहे. यामध्ये 1340 पुरुष तर 894 महिलांचा समावेश होतो. आज 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 4953 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4205 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.