Big9news Network
एका वाहनासह ०९ वारस गुन्हे दाखल करून रुपये ९,६२,६६०/- चा मुद्देमाल जप्त
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर केलेल्या सामुहिक मोहिमेत दिनांक २५ डिसेंबर रोजी मा. आयुक्त सो. यांच्या आदेशा नुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उप अधीक्षक श्री. आदित्य पवार यांच्या नेतृत्वात मुळेगाव तांडा, सिताराम तांडा, ता. द. सोलापूर व गुळवंची तांडा, ता. उ. सोलापूर या परीसरातील अवैध दारू निर्मीती व साठा ठिकाणांवर पहाटेच्या सुमारास छापे मारून एकुण ०८ वारस गुन्हे नोंद करून संजय बाळू चव्हाण रा-सिताराम तांडा, ता. द. सोलापूर या आरोपीस अटक करून रु. ३.७१ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बक्षीहिप्परगा, ता.द. सोलापूर या ठिकाणी अवैध हा. भ. दारूची वाहतूक करणारे वाहन क्र. एम एच २४ एएफ-०५६० हे वाहन अं. १००० लि. हा.भ. दारू सह जप्त करून हुनप्पा पवार रा- वडजी तांडा, ता. द. सोलापूर यास अटक करून गुन्हा नोंद केलेला आहे. तसेच सोलापूर शहर परीसरातील अवैध हा.भ. दारू विक्री ठिकाणांवर छापे मारून एकुण ०२ गुन्हे नोंद करून ६२ लि. हा.भ दारूसह ०२ आरोपीस अटक करून एकुण रु. ३५२०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर मोहिमेत निरीक्षक अ विभाग श्री.एस.एस.फडतरे, निरीक्षक व विभाग श्री.एस. एम. मस्करे, निरीक्षक भरारी पथक श्री. एस.ए. पाटील, निरीक्षक सिमा तपासणी नाका, इतर अधिकारी व जवान स्टाफ यांनी सहभाग घेतला.
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर या विभागाकडून अवैध दारू विक्री, निर्मीती ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवले जात असुन सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, निर्मीती ठिकाणांवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत.
विभागाने दिनांक ०१ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात एकुण १२९ गुन्हे नोंदवुन त्यापैकी वारस ११६ व बेवारस १३ गुन्ह्यांची नोंद करून एकुण ८८ आरोपींना अटक केली आहे. सदर कारवाईमध्ये १३ वाहनासह ५१,६६,५२०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आवाहन –
विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असुन अवैध दारू विक्री, निर्मीती वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हा. भ. दारू, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा. तसेच नविन वर्षाच्या पार्श्वभुमीवर हॉटेल मालकांना व व्यवस्थापकांना सुचित करण्यात येते की, त्यांना त्यांच्या हॉटेलमध्ये या विभागाच्या एक दिवसीय क्लब परवाना नमुना FL४-A मंजुर केल्याशिवाय मद्याची पार्टी आयोजीत करण्याची परवानगी नाही. ३१ डिसेंबर रोजी अशा हॉटेल्सची या विभागाकडून अचानकपणे तपासणी केली जाणार आहे. विनापरवाना मद्याची पार्टी आयोजीत केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क