Big9news Network
सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 10 जण बरे झाले परंतु 3 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.
सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि.25 जून रोजी कोरोनाचे नवे 5 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 2 स्त्रियांचा समावेश आहे.
आज एकूण 779 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 774 निगेटिव्ह तर 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 10 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.