रिलायन्स आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब, कष्टकरी आणि विडी कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. याचे उद्घाटन बुधवारी पत्रकार अजित उंब्रजकर, विजय गायकवाड आणि आरती कुसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संचालक सुनील गुंड यांची उपस्थिती होती. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे कष्टकरी, मजूर आणि विडी कामगारांचे हाल होत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधलकी म्हणून आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्स आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दीड हजार कुटुंबांना अन्नधान्याचे कीट वाटण्यात येणार आहेत. याचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. विनायक नगर, निलम नगरासह विविध भागातील विडी कामगारांना कुपनद्वारे धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून रोज 200 कुटुंबांना धान्य वाटप होणार आहे.
Leave a Reply