Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big 9 News Network

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत केंद्र शासन पुरुस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना दि. १६/०७/२०२० रोजी सुरु झाली त्याअंतर्गत लॉकडाऊन च्या काळात पथविक्रीत्यांचे नुकसान झाले आशा पथविक्रीत्यांना कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकेच्या मार्फत रूपये १००००/- देण्याबाबत शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आले. त्यानुसार सोलापूर मनपा मार्फत ११८६७ पथविक्रेत्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ४५१० बँकेने मंजूर करून प्रत्येकी १०००० रु. वाटप केले आहे .

तसेच २०२१ मध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली तेव्हा राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत ज्या फेरीवाल्यांनी १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज केले आहे . आशा फेरीवाल्यांना १५०० रु. ऑनलाईन त्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यापैकी २२३४ फेरीवाल्यांचे बँक खाते क्रमांक IFSC CODE, इत्यादी update नसल्यामुळे त्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यापैकी आजतगायत ८९६ फेरीवाल्यांनी बॅंक खाते क्रमांक, IFSC CODE NULM विभागात कार्यरत असणाऱ्या समुदाय संघटक यांनी सदर फेरीवाल्यांना फोन करून मागून घेऊन सदर फेरीवाल्यांचे बँक खाते क्रमांक, IFSC CODE, इत्यादी update केले आहेत .उर्वरित १३३८ फेरीवाल्यांनी यु.सी.डी.(NULM) विभागात कार्यरत असणाऱ्या समुदाय संघटक यांच्याकडे दोन दिवसात बँक खाते क्रमांक, IFSC CODE जमा करावेत व सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *