उजनी- सोलापूर दुहेरी पाईपलाईन साठी महापौर,आयुक्त ॲक्शन मोडमध्ये ;वाचा सविस्तर

Big 9 News Network

सोलापूर-उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाची तसेच उजनी येथे सुरू करण्यात आलेल्या जकवेलच्या कामाची,वरवडे टोलनाक्याजवळ ब्रेक प्रेशर टँकची पाहाणी आज महापौर श्रीकांचना यन्नम,आयुक्त पि. शिवशंकर ,स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी त्रम्बक ढेगळे-पाटील,संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.यावेळी आयुक्त पि. शिवशंकर यांनी भूसंपादना संदर्भात आज काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहाणी केली असता त्या ठिकाणी मोजणी करताना झाड नव्हती असे निदर्शनास आले आहे. त्याबद्दल पुन्हा सटलाईटच्या माध्यमातून त्या शेतात कुठले पीक होते याची माहिती घेण्यात येईल व याबद्दल राज्य शासनाला कळवण्यात येईल.तसेच उजनी येथे सुरू करण्यात आलेल्या जॅकवेलची पाहणी केली.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी उजनी ते सोलापूर दुहेरी पाइपलाइन काम सुरू असून ज्या शेतकऱ्यांच्या जमीन जाणार आहे अशा काही शेतीची पाहणी केली.संबंधित विभागास पुन्हा त्या ठिकाणीची व्यवस्थित पणे मोजणी करून ती राज्य शासनाकडे पटविण्यासाठी सूचना दिल्या.तसेच उजनी येथे जॅकवेलचे व काॅफर डॅमचे काम सुरू असून ते सुद्धा जलदगतीने करावे असे सूचना संबंधित विभागास दिले.यावेळी एमजेपी अधिकारी भांडेकर,साहाय्यक कार्यकारी अभियंता दीपक कोळी उप अभियंता, देवीदास मादगुंडी,ढावरे,सहाय्यक अभियंता स्मार्ट सिटी एजाज शेख ,ड्रोन पायलट प्रवेश कसारे, मक्तेदार श्रीनिवास राव, सहाय्यक अभियंता स्मार्ट सिटी उमर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.