BIG 9 NEWS NETWORK
कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेट नुसार राज्य सरकारने निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर हे रद्द करण्यात आलेले आहेत. तर आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीन स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. या मोठ्या निर्णयामुळे 33 जिल्ह्यांमध्ये स्तर (३)चे निर्बंध लागू झालेले आहेत. या ३३ जिल्ह्यामध्ये सोलापूरचा समावेश होतो.
असे आहेत नियम…
तिसऱ्या स्तरात अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल.
अत्यावश्यक नसलेली दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दिवसात दुपारी 4 पर्यंत खुली ठेवता येतील.
म्हणजेच शनिवारी-रविवारी अत्यावश्यक असणारी दुकाने ही बंद राहतील परंतु ,याबाबत सोलापूर महापालिकेचे आयुक्त यांनी स्वतंत्र आदेश काढले नसल्याने आज आज शनिवार 26 जून रोजी सर्व प्रकारची दुकाने सुरू राहतील. तिसऱ्या स्तरावरील असलेल्या सोलापूर शहरातील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास महापालिका आयुक्त याबाबत निर्णय घेऊ शकतात.
सोलापूर शहर याबाबत सुधारित आदेश अद्यापही काढले नसल्याने सर्व प्रकारची दुकाने सुरू राहतील अशी माहिती सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. सोलापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 0.64 इतका कमी झालेला आहे. तर ॲक्टिव्ह पेशंट संख्या 56 इतकी आहे. या सर्वांचा विचार करून महापालिका आयुक्त आदेश काढतील असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
काल शुक्रवार पासूनच व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यातच काहींनी व्हाट्सअप द्वारे शनिवारी -रविवारी दुकाने बंद असून लॉकडाऊन होणार असल्याची माहिती व्हायरल केली होती.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काय सुरू राहणार आणि काय बंद असेल याबाबत आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर नवे आदेश लागू करू शकतात.
Leave a Reply