Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

भरारी पथकात संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे प्रमुख असतील.

वैध मापन शास्त्र विभागाचे वजनमापे निरीक्षक ए. डी. गेटमे (९४२२४९४१९२) हे सदस्य सचिव तर सदस्य म्हणून साखर कारखाना हद्दीतील पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार, लेखा परीक्षक पी. आर. शिंदे (९५५२६७२०११) (पंढरपूर, सांगोला, माळशिरस), लेखा परीक्षक एन.डी. माडे (९९२२८८२४२९) (बार्शी, माढा, करमाळा, मोहोळ), लेखा परीक्षक के.आर. धायफुले (९८२२०८४६७८)(उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा) आणि शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश असेल.

भरारी पथकांची कार्यप्रणाली –

भरारी पथकाने स्वयंस्फूर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देऊन वजन काट्यांची तपासणी करावी.
शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे दिली जाते का, खात्री करणे.
वजन काट्याबाबत गैर प्रकार होत असल्याचे किंवा पोलीस तक्रार असेल तर तपासणी करून कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *