Big9news Network
पुणे -सोलापूर रोड वरील टेंभुर्णी- इंदापूर मधील टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी अद्यावत करण्यात आलेली सिस्टिम हँग झाल्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत अशी माहिती वाहन चालक सिद्धेश्वर स्वामी यांनी दिली.
लांबचा प्रवास करताना चार चाकी वाहने, तसेच जड वाहने यांच्याकडून टोल घेण्यात येतो. टोल वसुलीसाठी यादी पैसे आकारून पावती देण्यात येत होती आता अद्यावत पद्धतीमुळे फास्टटॅग सिस्टीम सुरू करण्यात आले आहे .परंतु, सदर सिस्टीम हँग झाल्यामुळे वाहनधारकांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या जवळपास दोन किलोमीटरपर्यंत रांगा असल्याची माहिती उपस्थित वाहनधारकांनी दिली.