शहर | आज एकही मृत्यू नाही; तर नवे बाधित रुग्ण 10

Big9news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 8 जण बरे झाले तर एकही मृत्यू नाही.

सोलापूर शहरात आज रविवारी दि.27 जून रोजी कोरोनाचे नवे 10 रुग्ण आढळले असून यामध्ये 6 पुरुष तर 4 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 961 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 951 निगेटिव्ह तर 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 8 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. कोरोनामुळे आज एकही जणांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.