ग्रामीण | आज बरे झाले 402; तर नवे बाधित रुग्ण 351

Big9news Network

आज दि.27 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 351 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

आज रविवारी 27 जून रोजी ग्रामीण भागातील 351 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 234 पुरुष तर 117 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 402 आहे. यामध्ये 223 पुरुष तर 179 महिलांचा समावेश होतो. आज 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 5143 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4792 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.