Big9news Network
महसूल विभागातला शेवटचा घटक म्हणून ओळखले जाणाऱ्या कोतवाल संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्या करिता सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल यांच्या पदोन्नती व वेळीवेळी दिलेल्या निवेदनातील प्रमुख प्रलंबित मागण्यां असून, कोतवाल संवर्गातुन शिपाई संवर्गात पदोन्नती गेल्या ११ वर्षांपासून प्रलंबित आहे.कोव्हीड१९ च्या प्रादुर्भावाने मयत झालेल्या कोतवाल कर्मचारी यांच्या शासन निर्णयानुसार ५०,०००००(पन्नास लाख रु) वारसांना मदत मिळणे, ६/२/२०१९ च्या शासन निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी करणे, सेवा पुस्तक आद्यवत करणे, सन २०२० व २०२१ यावर्षी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे,कोतवाल कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर शासन निर्णयानुसार शिल्लक अर्जित रजेंची रक्कम मिळण्याबाबत, बार्शी तालुक्यातील दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळण्याबाबत, कोतवलांच्या रिक्त जागा भरणे बाबत, अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मा जिल्हाधिकारी यांना महसूल संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, कोतवाल संघटनेचे प्रदेश सरचिटणीस कृष्णा शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राहुल तोडकरी, मल्लिनाथ बाळगी, भगवान पारसी, गोरख ढोबळे, प्रल्हाद खरे, गुरुदास अरणे, कार्याध्यक्ष राजाभाऊ साठे, कोषाध्यक्ष आधुसिद्ध पुजारी, सहकार्याध्यक्ष बसवत सुतार, सह कोषाध्यक्ष संजय कुरवडे, सहसचिव बंदेनवाज डफेदार, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख प्रविणकुमार बाबर, सल्लागार भागवत चंदनशिवे, बाळासाहेब कांबळे, रवी धेंडे, गुलाब सोनवणे, प्रवक्ता नवनाथ इंगोले, प्रवीण गुंजले, रशीद शेख, संघटक आनंद इंगळे , मसा साबळे, उमेश क्षिरसागर, शहाजी हुलगे, शिवाजी काळे, संपर्क प्रमुख रामभाऊ खरात, बालाजी पाटील, अर्जुन सनके, दयानंद क्षिरसागर, महिला प्रतिनिधी सुलोचना देशमुख, एम एस कोळी यांच्या उपस्थितीत मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
कोतवलांचा चा विषय कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून, त्याबाबत वारंवार निवेदन, आंदोलन, संप करून देखील पदोन्नतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. कोतवाल हा महसूल विभागातला शेवटचा घटक असला, तरी तो सध्या शेवटची घटका मोजत आहे. अशी अवस्था सध्या कोतवलांची झाली आहे.
गेल्या ११ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात पदोन्नती झाली नसून, महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात दरवर्षी पदोन्नती देण्यात येते, फक्त सोलापूर जिल्ह्यातच पदोन्नती देण्यात आली नाही. हे पाहता कोतवाल कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असून, पदोन्नती चे वय ४५ वर्षाचे मर्यादा असल्याने जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदार, हलगर्जीपणा पणामुळे अनेक कोतवाल कर्मचारी पदोन्नती पासून वंचित राहिले आहेत.
जर,येत्या ८/८/२१ पर्यंत कोतवलांच्या वरील प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोतवाल ९/८/२१ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी.
यावेळी,अक्कलकोट तालुका अध्यक्ष शफील वाडीकर, सरचटणीस शिवानंद कोळी, हणमंत सानप, सुनील मुलगे, नाना पवार, अनिल भोसले, बालाजी ओव्हाळ, गौतम ठोकळे, धानय्य स्वामी, महादेव खिलारे, धानय्य क्षिरसागर, दत्ता कदम, हमीद शेख, सुनील कोळी, समाधान सुर्यगंध, बाळासाहेब खेन्दाड, सुदर्शन गुरव, यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply